आयुष म्हात्रेने केला आणखी एक अप्रतिम T20 विश्वविक्रम, 18 वर्षे 137 दिवसांचा इतिहास रचला
लक्ष्याचा पाठलाग करताना म्हात्रेने 59 चेंडूंत 5 चौकार आणि 9 षटकारांसह 104 धावांची नाबाद खेळी केली. या स्पर्धेतील त्याचे हे सलग दुसरे टी-२० शतक ठरले. याआधी शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) लखनौमध्येच म्हात्रेने विदर्भविरुद्धच्या सामन्यात ५३ चेंडूत नाबाद ११० धावा केल्या होत्या.
T-20 क्रिकेटमध्ये सलग दोन डावात शतके झळकावणारा म्हात्रे हा जगातील सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे, त्याने वयाच्या १८ वर्षे १३७ दिवसांत ही कामगिरी केली. त्याने वयाच्या १८ वर्षे २८२ दिवसांत ही कामगिरी करणाऱ्या फ्रान्सच्या गुस्ताव्ह मॅकॉनला मागे टाकले.
Comments are closed.