लातूर जिल्ह्यातील नगर परिषद निवडणूकीस खोडा, मतदानाच्या काही तास अगोदर निवडणूक पुढे ढकलण्यात आली

लातूर जिल्ह्यातील 4 नगरपरिषदेच्या आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू होती. रेणापूर नगर पंचायत निवडणूक पुढे ढकलेली होती . आता निलंगा नगर परिषद निवडणूक उद्या होणार नाहीत. तसेच उदगीर नगर परिषदेच्या 3 प्रभागांची पण निवडणूक होणार नाही. या सावळ्या गोंधळामुळे सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य निवडणूक आयोग यांचेकडील आदेश दि. 29/11/2025 नुसार निलंगा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 मध्ये अध्यक्ष पदासाठी उमेदवारानी व सदस्य पदासाठी 2 उमेदवारांनी अपिल दाखल केले होते. सदर अपिलाचा निर्णय दि. 25/11/2025 रोजी लागल्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक मुदत न मिळाल्यामुळे संपूर्ण नगरपरिषद ची सार्वत्रिक निवडणूक स्थगित केली आहे.
सदर निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम उमेदवारी मागे घेण्याच्या टप्यापासून पुढे दि 04/12/225 राजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार दि. 10/12/2025 रोजी दुपारी तीन वाजपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल व दि. 20/12/2025 रोजी मतदान घेण्यात येईल सदर मतदानाचा निकाल दि.21/12/2025 राजी घोषित करण्यात येणार आहे. राज्य निवडणुक आयोग यांच्या दि. 29/11/2025 च्या पत्रानुसार उदगीर न. प. मधील प्रभाग क्र. 8 अ, प्रभाग क्र. 15 ब आणि प्रभाग क्र. 16 ब च्या सदस्य पदाची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आहे. या मुळे सर्वञ गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

Comments are closed.