रत्नागिरी शहरात 64 हजार 746 मतदार मतदानाचा हक्क बजावणार

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. रत्नागिरी नगर परिषदमध्ये १६ प्रभागात ६९ मतदान केंद्रावर ६४ हजार ७४६ मतदार मंगळवारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ३१ हजार ३२४ पुरुष, ३३ हजार ४२१ महिला आणि इतर 1 आहेत. मंगळवारी सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. मतदान केंद्रावर वीज,पाणी,व्हिलचेअर आणि शौचालय अशा आवश्यक सेवा उपलब्ध केल्या आहेत.

Comments are closed.