‘रोहित- विराटशिवाय भारत 2027 चा वर्ल्ड कप जिंकू शकत नाही..’, या दिग्गजाने केला मोठा दावा!
काही काळापासून माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली यांच्या भविष्याबद्दल चर्चा सुरू होती. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर दोघांनीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळली आणि जबरदस्त कामगिरी केली. रोहितने तिसऱ्या वनडेमध्ये शतक ठोकले होते. आता रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीनेही शतक झळकावले. त्यानंतर माजी भारतीय सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत (Krushnamachari Shrikant) यांनी मोठं विधान केलं. त्यांनी म्हटलं की विराट कोहली आणि रोहित शर्मा नसतील तर भारत 2027 चा वनडे वर्ल्ड कप जिंकूच शकत नाही.
श्रीकांत यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं, विराट कोहली आणि रोहित शर्मा एका वेगळ्याच दर्जावर खेळत आहेत. या दोघांशिवाय 2027 वर्ल्ड कपची योजना यशस्वी होऊच शकत नाही. तुम्हाला एका टोकाला रोहित आणि दुसऱ्या टोकाला विराटची गरज असते. यावर प्रश्नच नाही.
ते पुढे म्हणाले की, रांचीमध्ये या दोघांच्या भागीदारीने दक्षिण आफ्रिकेला मानसिकदृष्ट्या खचवून टाकलं. श्रीकांत म्हणाले, जर रोहित आणि कोहली 20 ओव्हरपर्यंत टिकले, तर समोरची टीम हरतेच. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तेच झालं. ते अक्षरशः फक्त या दोघांच्या बॅटिंगमुळे बाहेर झाले.
श्रीकांत यांनी हेही अधोरेखित केलं की, फक्त एकच फॉरमॅट खेळूनही रोहित आणि विराट जी बांधिलकी, मेहनत आणि फिटनेस दाखवत आहेत, त्यावरून त्यांच्या क्षमतेबद्दलचे सर्व प्रश्न संपायला हवेत. ते म्हणाले, दोघांनी खूप मेहनत घेतली आहे. फक्त एकच फॉर्मॅट खेळून अशी मानसिकता कायम ठेवणं सोपं नसतं. माझ्या मते, त्यांनी 2027 वर्ल्ड कपसाठी आपली जागा पक्की करून टाकली आहे. त्यांच्या शिवाय आपण जिंकू शकत नाही.
Comments are closed.