आजारी वडिलांना भेटायला शिल्पासोबत लंडनला जायचे आहे, कुंद्राची हायकोर्टात याचिका

वडील आजारी असून त्यांना भेटायला पत्नी शिल्पा शेट्टीसोबत लंडनला जायचे आहे अशी मागणी करत व्यावसायिक राज कुंद्रा याने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दोन आठवडय़ांनी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

व्यापारी दीपक कोठारी यांनी 60 कोटी रुपयांच्या फसवणूक केल्याचा आरोप करत अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. कोठारी यांना बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या पंपनीत 60 कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले, मात्र त्यांनी या निधीचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी केला. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत शिल्पा शेट्टी व राज कुंद्राविरोधात जुहू पोलीस ठाण्यात लूकआउट नोटीस जारी केली आहे.

Comments are closed.