मणिपूरमध्ये 37,000 वर्ष जुना बांबू सापडला

हिमयुगाच्या रहस्याचा खुलासा

मणिपूरच्या इम्फाळ खोऱ्यात चिरांग नदीच्या काठावर वैज्ञानिकांना एक अदभूत गोष्ट मिळाली आहे. 37 हजार वर्षे जुना बांबू मिळाला असून यावर जुन्या काट्यांच्या खुणा स्पष्टपणे दिसून येत आहेत. हा आशियात आतापर्यंत मिळालेला सर्वात जुना काटेरी बांबूचा जीवाश्म आहे.

विशेष बाबी

? हा बांबू हिमयुगातील असून तेव्हा पृथ्वीवर अत्यंत थंडी होती.

? त्याकाळात युरोप आणि जगातील अनेक हिस्स्यांमधून बांबू पूर्णपणे संपले होते, परंतु मणिपूर-ईशान्य भारतात बांबूंचे अस्तित्व कायम राहिले.

? ईशान्य भारतात हवामान उबदार अन् आर्द्र होते, यामुळे बांबूला सुरक्षित जागा मिळाली.

?प्राण्यांना बांबू खाता येऊ नये म्हणून काटे हेते. ही सुरक्षेची जुनी पद्धत 37 हजार वर्षांपूर्वीही होती.

बांबूचा जीवाश्म मिळणे अत्यंत अवघड

बांबू पोकळ अन् नरम असतात, लवकर सडून जातात. याचमुळे जगात बांबूचे जीवाश्म अत्यंत कमी प्रमाणात मिळतात. यावेळी जे मिळाले त्यावर गाठी आणि काट्यांच्या खुणाही साफ आहेत, हा प्रत्यक्षात एक चमत्कार आहे.

याचा अर्थ काय?

ईशान्य भारत हिमयुगातही हिरवेगार जंगल असलेला भाग होता. पूर्ण जग थंडीने गोठून गेले असताना मणिपूरमध्ये बांबू फुलत होते. हा भाग बायाडायव्हर्सिटी हॉटस्पॉट होता, म्हणजेच वृक्ष, रोप आणि प्राण्यांसाठी सुरक्षित आश्रय होता. काटेरी बांबू आशियात कमीतकमी 37 हजार वर्षांपासून असल्याचेही स्पष्ट झाले आहे. जगातील प्रसिद्ध नियतकालिक रिह्यू ऑफ पालियोबॉटनी अँड पालियोनोलॉजीमध्ये हा शोध प्रकाशित झाला आहे. एक छोटासा बांबूचा तुकडा लाखो वर्षांपूर्वी मणिपूरची भूमी किती खास होती हे स्पष्ट करत आहे. मणिपूरने हिमयुगातही बांबूला वाचविले होते.

Comments are closed.