चेन्नई मेट्रो ट्रेन बोगद्यात अडकली

चेन्नई:

चेन्नई मेट्रोची एक रेल्वे मंगळवारी सकाळी भुयारात बंद पडली. तांत्रिक बिघाडामुळे चेन्नई मेट्रोची सेवा विस्कळीत झाली. संबंधित घटना ब्ल्यू लाइनवर पुरात्ची थलाइवर डॉ.एम.जी. रामचंद्रन सेंट्रल मेट्रोनजीक घडली. अचानक उद्भवलेल्या या स्थितीमुळे प्रवासी घाबरून गेले होते. रेल्वे बंद पडल्याचे कळताच प्रवाशांना भुयारात निर्मित वॉकवेमधून नजीकच्या स्थानकापर्यंत चालत जावे लागले आहे. चेन्नई मेट्रो रेलचे कर्मचारी आणि तंत्रज्ञांनी प्रवाशांना तेथून बाहेर पडण्यास मदत केली.

Comments are closed.