दहशतवादी ड्रोन हल्ल्याच्या तयारीत होते
दिल्ली स्फोटाप्रकरणी मोठा खुलासा :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली स्फोटाच्या तपासादरम्यान दहशतवादी दानिशच्या फोनमधून अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली आहे. डिलिट करण्यात आलेली हिस्ट्री, फोटो, व्हिडिओ आणि अॅप डाटा पडताळल्यावर दानिश हा ड्रोन तंत्रज्ञान आणि शस्त्रात्र्घंवरून सक्रीय स्वरुपात काम करत होता असे कळले आहे.
तपासादरम्यान दानिशच्या फोनमध्ये ड्रोन्सची अनेक छायाचित्रे आढळून आली आहेत. यात हमासप्रमाणे वापरण्यात येणाऱ्या ड्रोनचे डिझाइनही सामील आहे. दानिश दीर्घकाळापासून ड्रोन तंत्रज्ञान शिकत होता हे यातून स्पष्ट होते. आपण ड्रोन हल्ल्याची तयारी करत होतो असे चौकशीत दानिशने मान्य केले आहे. सुमारे 25 किलोमीटरपर्यंत उ•ाण करून हल्ला करू शकेल अशाप्रकारचा ड्रोन तयार करण्याचा त्याचा प्रयत्न होता.
रॉकेट लाँचर, स्फोटकांचे व्हिडिओ
फोनमध्ये ड्रोन्सच्या छायाचित्रांसोबत रॉकेट लाँचरची देखील अनेक छायाचित्रे मिळाली आहेत. तसेच ड्रोन निर्मिती, त्याला मॉडिफाय करणे, त्याला विस्फोटके जोडण्याच्या पद्धती दर्शविणारे अनेक व्हिडिओ मिळाले आहेत. दानिशला हे सर्व व्हिडिओ आणि माहिती एका खास अॅपद्वारे पाठविली जात होती. आता याप्रकरणी एनआयए तपास करत आहे. दानिश ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती मिळवत होता आणि एखाद्या मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होता. तपास यंत्रणा आता दानिशचे नेटवर्क आणि विदेशी संपर्कांचा शोध घेत आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएचे छापे
यापूर्वी एनआयएने दिल्लीतील कार स्फोटाच्या तपासाच्या अंतर्गत सोमवारी जम्मू-काश्मीर आणि उत्तरप्रदेशात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. अनेक आरापी आणि संशयितांशी निगडित परिसरांच्या झडतीदरम्यान विविध डिजिटल उपकरणे आणि अन्य आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियां, कुलगाम, पुलवामा आणि अवंतिपोरा जिल्ह्यांमध्ये एकूण 8 ठिकाणी तर उत्तरप्रदेशातील लखनौ येथे एका ठिकाणी झडती घेण्यात आली.
Comments are closed.