स्मृती, पलाश आता 7 डिसेंबरला बांधणार लग्नगाठ? स्मृतीच्या भावाचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाला…
स्मृती मानधना पलाश मुच्छाल लग्न पुढे ढकलले: टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि बॉलिवूडचा (Bollywood News) सुप्रसिद्ध म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल (Palash Muchhal) थाटामाटात साता जन्माची गाठ बांधणार होते. पण, काही कारणास्तव दोघांचा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला. लग्नाच्या आदल्या रात्री विवाहसोहळा रद्द करुन पुढे ढकलण्याचं कारण सुरुवातीला स्मृती वडिलांची खालावलेली तब्येत असल्याचं समोर आलं. पण, त्यानंतर पलाशच्या फ्लर्टी चॅट्सचे (Palash Muchhal Flerty Chats) काही स्क्रिनशॉर्ट्स व्हायरल झाले आणि एकंदरीतच प्रकरणानं वेगळं वळण घेतलं. पलाशनं स्मृतीची फसवणूक केल्याचं बोललं जाऊ लागलं. पण, अद्याप मानधना कुटुंबीयांकडून कोणतंही स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. अशातच अचानक दोन आठवड्यांनी सोशल मीडियावर नवी तारीख व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये मानधना आणि पलाशचं लग्न 7 डिसेंबरला होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण नेमकं घडलंय काय? खरंच स्मृती आणि पलाशचा विवाहसोहळा 7 डिसेंबरला होणार आहे का? यावर आता स्मृती मानधनाच्या भावानं स्पष्टीकरण दिलंय.
गेल्या महिन्यात 20 नोव्हेंबरपासून मानधना आणि पलाश यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती, 23 नोव्हेंबरला सांगतील दोघं लग्न करणार होते. पण, लग्न अचानक पुढे ढकललं.
लग्न पुढे ढकलल्यानंतर, पलाश मुच्छलचं नाव सर्वात आधी मेरी डि’कोस्टा नावाच्या कोरिओग्राफरशी जोडलं गेलं. मेरीसोबतच्या एका फ्लर्टी चॅटचा स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, पलाशचं नाव नंदिका द्विवेदी आणि गुलनाज खान नावाच्या तरुणींसोबत जोडलं गेलं. या संपूर्ण घटनेनं पलाशला धक्का बसला आणि त्याची तब्येत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. अशातच आता, सुमारे 10 दिवसांनी, पलाश आणि मानधनाच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
खरंच मानधना आणि पलाश 7 डिसेंबरला करतायत लग्न?
23 नोव्हेंबरचं लग्न पुढे ढकलल्यानंतर आता स्मृती आणि पलाश 7 डिसेंबरला लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. पण, आता स्मृतीच्या भावानं लग्नाच्या नव्या तारखेवर स्पष्टीकरण दिलंय.
हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, स्मृती मानधनाचा भाऊ श्रवण मानधनानं सांगितलं की, “मला लग्नाच्या नव्या तारखेबाबत काहीच माहीत नाही… आतापर्यंत लग्न पुढेच ढकलण्यात आलंय…” अशातच मानधनाच्या भावाच्या या वक्तव्यावरुन स्पष्ट होतंय की, लग्नाच्या नव्या तारखेच्या चर्चा फक्त सध्या अफवाच आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.