विराट-रोहित किती वाजता अॅक्शन दिसणार ते दुसरा सामना मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या सर्वकाही….
India vs South Africa 2nd ODI LIVE Scorecard Update : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांचा दुसरा वनडे सामना छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 1-0 अशी आघाडी घेत असून, हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
पहिल्या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने रांचीतील JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळताना 17 धावांनी शानदार विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात भारत खेळपट्टी आणि परिस्थिती लक्षात घेता पहिल्या सामन्यातीलच कॉम्बिनेशन कायम ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. तसेच, पाचव्या क्रमांकावर वाशिंगटन सुंदरला उतरण्याचा निर्णय घेतला जातो का, की मग रविंद्र जडेजाला त्या स्थानावर बढती दिली जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Comments are closed.