दोन वर्षांपासून प्रेमसंबंध; मार्चमध्ये पळून लग्न, नऊ महिन्यात IAS अधिकाऱ्याच्या 25 वर्षीय मुलीन


ताडेपल्ली : हुंड्यासाठी सातत्याने छळ होत असलेल्या आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Crime News) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात रविवारी घडली. माधुरी साहित्यीबाई (२५) असे तिचे नाव आहे. गेल्या मार्चमध्ये तिचा प्रेमविवाह झाला होता. हुंड्यासाठी छळ (Crime News) केला जात असल्याचा आरोप तिने केला होता. त्यामुळे छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. नांद्याल जिल्ह्यातील बुग्गनपल्ली येथील राजेश नायडू नामक तरुणासोबत ५ मार्च रोजी तिने विवाह केला होता.(IAS Officers Daughter end her life After Alleging Dowry Harassment)

Crime News : काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला

एका आयएएस अधिकाऱ्याची २५ वर्षीय मुलगी माधुरी साहित्यीबाई हिने आंध्र प्रदेशातील ताडेपल्ली येथील तिच्या घरी आत्महत्या केली. काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता. सप्टेंबरमध्ये तिचे पालक तिला घरी घेऊन आले. रविवारी ती बाथरूममध्ये संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी हुंडाबळी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.(Crime News)

Crime News : दोघांनी ५ मार्च रोजी लग्न केले आणि ७ मार्च रोजी त्यांच्या…

ती गेल्या काही महिन्यांपासून तिच्या पालकांसोबत राहत होती. ताडेपल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माधुरीच्या पालकांनी तक्रार केली की ती बराच वेळ बाथरूममधून बाहेर आली नव्हती. जेव्हा दरवाजा उघडला नाही तेव्हा त्यांनी तो तोडून आत पाहिले तर ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. माधुरीने काही महिन्यांपूर्वी तिचा पती राजेश नायडूवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, माधुरी आणि राजेश हे नांद्याल जिल्ह्यातील बीतंचर्ला मंडळातील बुग्गनपल्ली या एकाच गावातील रहिवासी होते. दोघे प्रेमासंबंध होते. या काळात, माधुरीने बॅकलॉगमुळे तिचे बी.टेक.चे शिक्षणही अर्धवट सोडले. दोघांनी ५ मार्च रोजी लग्न केले आणि ७ मार्च रोजी त्यांच्या कुटुंबियांना कळवले. नंतर लग्नाची नोंदणी करण्यात आली. मात्र काही महिन्यांनंतर, माधुरीने तिच्या पालकांना फोन करून सांगितले की तिला हुंड्यासाठी छळ होत आहे. त्यानंतर कुटुंबाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिला घरी आणले. तेव्हापासून ती तिच्या पालकांसोबत राहत आहे.

Crime News : पोलिसांनी दाखल केला गुन्हा

ताडेपल्लीचे मंगलागिरीचे डीएसपी मुरली कृष्णा म्हणाले की, हुंडा मृत्यु संहितेच्या कलम ८० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आणि तपास सुरू आहे. लग्नापासून कुटुंबात निर्माण झालेल्या तणाव आणि कथित छळाच्या इतर पैलूंचाही पोलिस तपास करत आहेत.

Crime News : अतिरिक्त हुंड्याची मागणी करण्यास सुरुवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी आणि राजेश जवळपास दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मार्चमध्ये त्यांनी पळून जाऊन लग्न केले. माधुरीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, राजेश आणि त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या कथित छळाबद्दल माधुरीने माहेरच्या लोकांना सांगितले होते. आईने तक्रारीत असेही म्हटले आहे की, माधुरीला घरी परत आणण्यासाठी त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली होती. राजेशने वचन दिले होते की तो माधुरीला सन्मानाने, वडिलधाऱ्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक आपल्या घरी घेऊन जाईल. त्याने आम्हाला माधुरीला त्याच्यासोबत पाठवण्यासाठी पटवून दिले. त्यानंतर लगेचच त्याने अतिरिक्त हुंड्याची मागणी करण्यास सुरुवात केली आणि तिला धमक्या देऊ लागला” असे तिच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Crime News : पतीने सांगितले तिच्या कुटुंबाकडून मानसिक त्रास दिला जात होता

राजेश सोमवारी पोलिसांकडे पोहोचला आणि त्याने माधुरीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारी एक याचिका सादर केली. त्याच्या याचिकेनुसार तिचे पालक दोघांच्या लग्नाला मान्यता देत नव्हते. त्यांनी तिला जबरदस्तीने माहेरी आणले होते.”तिने मला अनेक मेसेज पाठवून आपली व्यथा सांगितली. तिला तिच्या कुटुंबाकडून मानसिक त्रास दिला जात होता. मला सोडून देऊन दुसऱ्या लग्नाला तयार होण्यास दबाव टाकला जात होता. या सततच्या दबावामुळे ती अत्यंत असुरक्षित मनस्थितीत गेली होती” असे राजेशने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे,

Crime News: माधुरी प्रेग्नंट असती

तर माधुरी गर्भवती होती. तिच्या पोटात मूल वाढवत आहे याचाही त्यांनी विचार केला नाही. ही आत्महत्या नाही, हा खून आहे. ते प्रकरणाला वळसा घालण्यासाठी आपल्या पदाचा वापर करत आहेत” असा आरोप त्याने केला आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. दरम्यान, डीएसपी कृष्णा यांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल प्रतीक्षेत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.