19 मिनिटं 34 सेकंदाचा व्हिडीओ खरा की खोटा?; धक्कादायक माहिती समोर, नेमकं प्रकरण काय?


१९ मिनिटांचा जोडप्याचा व्हिडिओ तथ्य तपासणी: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 19 मिनिटं 34 सेकंदाचा हा व्हिडीओ (19 minute video viral video) आहे. सदर व्हिडीओ खरा आहे की खोटा, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु तुम्हाला हा व्हिडीओ चुकून सापडला तरी तो शेअर करू नका, अन्यथा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. या व्हिडीओमुळे अनेक लोकांची, विशेषतः सोशल मीडियावर रील्स तयार करणाऱ्या मुलींची बदनामी झाली आहे. 19 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मुलींसारख्या दिसणाऱ्या मुलींबद्दल लोक सोशल मीडियावर अश्लील कमेंट्स पोस्ट करत आहेत.

19 मिनिटांच्या, 34 सेकंदांचा व्हिडीओ कोणाचा? (19.34 minute video viral video)

19 मिनिटांच्या, 34 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये, एक जोडपे आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर कसा पोहोचला हे अद्याप समोर आलेले नाहीय. प्रसिद्धी मिळविण्यासाठी या जोडप्याने जाणूनबुजून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे की दुसरे कारण आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

व्हायरल व्हिडीओमुळे अनेक मुलींची बदनामी- (Couple Viral Video)

सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक इन्स्टाग्रामवर काही मुलींची तुलाना 19 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मुलीसोबत करत आहे. स्वीट जन्नत नावाच्या एका तरुणीसोबत अशीच एक घटना घडली. पीडित तरुणीने स्वत: पोस्ट करत मी व्हिडीओमधील मुलगी नसल्याचं स्पष्ट केलं. परंतु अनेक युजर्स सोशल मीडियावर तिला मेसेज करत व्हिडीओची मागणी करत असून यासाठी पैसे मोजायलाही तयार असल्याचं सांगत आहे.

AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करत तरुणाने व्हिडीओ बनवला? (19 minute Couple viral video)

19.34 सेकंदाचा व्हिडीओ तरुणाने एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करत बनवल्याचा दावाही केला जात आहे. तसेच संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केल्याचंही सांगितलं जात आहे. एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस फटके देत असल्याचं दिसत आहे. परंतु हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे?, पोलीस ज्या तरुणाला मारहाण करताय, तोच तरुण व्हिडीओमधील आहे की नाही?, याचीही कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीय.

ही बातमीही वाचा:

Pune Crime : नात्यातील महिलेशी अनैतिक संबंधाचा संशय, चुलत भावाला संपवण्यासाठी पुण्यात चार लाखांची सुपारी

आणखी वाचा

Comments are closed.