राज ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट, तब्येतीची केली विचारपूस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांची त्यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच विविध विषयांवर त्यांच्यासोबत चर्चा केली.
संजय राऊत हे आजारपणामुळे गेल्या महिन्याभरापासून सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय राऊत यांना तूर्त काही दिवस विश्रांती घेण्याचा आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार ते सध्या घरीच विश्रांती घेत आहेत.

Comments are closed.