7 डिसेंबरची तारीख ठरेल का शुभमुहूर्त? स्मृती मंधानाच्या भावाने दिले महत्त्वाचे संकेत – Tezzbuzz
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि संगीतकार पलाश मुछाल यांच्या लग्नाबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की हे दोघे 7 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. यापूर्वी त्यांचे लग्न 23 नोव्हेंबरला होणार होते, मात्र अचानक उद्भवलेल्या कारणांमुळे तो समारंभ पुढे ढकलण्यात आला होता.
या अफवांवर आता स्मृतीच्या कुटुंबाने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांदरम्यान, स्मृतीचा भाऊ श्रवण मंधाना स्पष्ट केले आहे की, “मला या अफवांबद्दल काही माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे, लग्न अद्याप पुढे ढकललेलेच आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे 7 डिसेंबरच्या कथित लग्नाविषयीची अनिश्चितता आणखी वाढली आहे.
लग्न पुढे ढकलण्यामागे दोन्ही कुटुंबांतील आरोग्य समस्या महत्त्वपूर्ण ठरल्या. रिपोर्ट्सनुसार, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी पलाशचीही तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी आरोग्याला प्राधान्य देत हा समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, लग्न स्थगित झाल्यानंतर सोशल मीडियावर एका कोरिओग्राफर आणि पलाश यांच्यातील कथित चॅट लीक झाल्याचा दावा समोर आला. त्यानंतर पलाशने स्मृतीला धोका दिल्याची चर्चा पसरली. मात्र या दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसून ना स्मृती मंधाना, ना पलाश मुछाल यांनी या प्रकरणावर कोणतेही विधान केलेले नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अवघ्या तीन वर्षांचा असताना शाहिद कपूरवर कोसळलं दु:खांचं डोंगर; जवळच्या व्यक्तीनेही केली नाही मदत
Comments are closed.