जुन्या जखमा उकरून काय फायदा? अमिताभवरील प्रेमाबाबत जया बच्चन यांची स्पष्ट प्रतिक्रिया – Tezzbuzz

अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan)अनेकदा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. पापाराझींवर नाराजी व्यक्त करणे असो किंवा सामाजिक विषयांवर मत मांडणे असो, त्या नेहमी ठाम बोलतात. आता त्यांनी त्यांच्या विवाहाबद्दल आणि अमिताभ बच्चनसोबतच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

जया बच्चन यांनी मोजो स्टोरीवरील बरखा दत्त यांच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलले. बरखा दत्त यांनी त्यांना विचारले की, “तुम्हाला पहिल्यांदा कधी जाणवलं की तुम्ही अमिताभ बच्चनवर प्रेम करता?” यावर जया बच्चन हसत म्हणाल्या, “जुन्या जखमा का उघडताय?” पुढे त्या म्हणाल्या, “मी ५२ वर्षांपासून एकाच माणसाशी लग्न केले आहे. त्याच्यावर यापेक्षा जास्त प्रेम करणे शक्यच नाही.”

लग्नाबद्दल बोलताना त्यांनी एक मजेशीर तुलना केली. त्या म्हणाल्या, “लग्न म्हणजे दिल्लीचा लाडू… खाल्लात तर कठीण, नाही खाल्लात तरी कठीण.” त्या पुढे सांगतात की आजच्या पिढीला त्या लग्नाबद्दल जबरदस्ती करत नाहीत. इतकेच नाही, तर त्यांनी हेही नमूद केले की तिला तिच्या नातीनेही लग्न करावे असं वाटत नाही.

जया बच्चन यांनी सांगितले की त्यांचे आणि अमिताभ बच्चनचे विचार एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. पण तेच त्यांच्या नात्याचे सामर्थ्य आहे. अमिताभ यांना लग्नाबद्दल काय वाटते असे विचारले असता जया म्हणाल्या, “मी त्यांना विचारले नाही. कदाचित ते म्हणतील की लग्न हे त्यांच्या आयुष्यातील चूक होती, पण मला ते ऐकायचं नाही. मुलाखतीत त्यांनी अमिताभचे कौतुक करत सांगितले, “त्यांचे व्यक्तिमत्त्व माझ्यापेक्षा वेगळे आहे आणि कदाचित त्यामुळेच मी त्यांच्यावर प्रेम केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी, अभिनेत्री नेहा शर्मा ईडीसमोर हजर

Comments are closed.