2 विकेटकीपर, 4 स्पिनर तर…; दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, शुभमन ग


दक्षिण आफ्रिका 5 सामन्यांच्या T20I मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ : एकदिवसीय मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. ज्यासाठी अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली आहे. पाच सामन्यांची टी-20 मालिका 9 ते 19 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. शुबमन गिल टीम इंडियाचा उपकर्णधार असणार आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान अचानक संघाची घोषणा!

रायपूरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान बीसीसीआयने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. सर्वात उल्लेखनीय म्हणजे शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांनी दुखापतीनंतर संघात पुनरागमन केले आहे. गिलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, परंतु मालिकेतील त्याचा सहभाग त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. पण, या मालिकेसाठी संघातून रिंकू सिंगला वगळण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ (Team India squad South Africa T20I series) –

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर.

हार्दिक पांड्याचं दोन महिन्यांनंतर पुनरागमन

हार्दिक पांड्या देखील दोन महिन्यांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन करत आहे. हा स्टार अष्टपैलू खेळाडू अंतिम सामन्यापूर्वी 2025 च्या आशिया कपमध्ये शेवटचा खेळला होता. तेव्हापासून तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही, परंतु अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली.

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक- (भारत वि एसए वेळापत्रक)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका डिसेंबर रोजी कटक येथे सुरू होईल. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी न्यू चंदीगड, 14 डिसेंबर रोजी धर्मशाळा, १७ डिसेंबर रोजी लखनौ आणि 19 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे सामने खेळवले जातील.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ सध्या आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा टी-20 संघ आहे, तर दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2026 च्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची मानली जाते.

हे ही वाचा –

Virat Kohli Century : आता थांबायचं नाय… विराट कोहलीचं द. आफ्रिकेविरुद्ध सलग दुसऱ्यांदा शतक, ‘किंग’कडून शतकांचा धमाका, रचला अनोखा पराक्रम

आणखी वाचा

Comments are closed.