स्मृती मानधनाशी लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाश मुच्छल संत प्रेमानंदांच्या आश्रमात दिसले; फोटो व्हायरल – Tezzbuzz

क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. 23 नोव्हेंबर 2025 रोजी दोघांचे लग्न होणार होते, मात्र स्मृतीच्या वडिलांच्या अचानक प्रकृती बिघडल्यामुळे समारंभ पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर पलाशचीही तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

या पार्श्वभूमीवर, अलीकडेच पलाश मुच्छल संत प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात भेट देताना दिसले. 2 डिसेंबर रोजी घडलेल्या या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये पलाश मास्क घालून सत्संगात जाताना दिसतो.

लग्नाची तयारी आधीच सुरू झाली होती, मेहंदी आणि हळदीचे समारंभ पार पडले होते, परंतु अचानक उद्भवलेल्या आरोग्य समस्यांमुळे समारंभ पुढे ढकलला गेला. यानंतर, पलाशवर काही अफवा आणि खाजगी गप्पांचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पसरले, ज्यामुळे त्याच्यावर फसवणूकीचे आरोप देखील आले. माञ, पलाश आणि स्मृती दोघांनीही या सर्व चर्चांवर अद्याप काहीही विधान केलेले नाही.

यासोबतच, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की दोघे 7 डिसेंबर रोजी लग्न करण्याची शक्यता आहे, मात्र अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न, तसेच पलाशची संत प्रेमानंद महाराजांशी भेट, सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हा क्षण अनमोल- रजनीकांत यांच्या इफ्फी सन्मानानंतर ऐश्वर्याची पोस्ट चर्चेत

Comments are closed.