Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
गद्दारांचा बुडबुडा फुटला आहे. आता गेलेले माघारी यायला सुरुवात झाली आहे. त्यांचा मधे आता बाचा बाची सुरु झाली आहे. त्यांच्या मधे पू ल देशपांडे यांच्या कथेत असा उल्लेख असायचा त्याप्रमाणे बा..चा… बाची सुरू झाली आहे. आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटला आहे. राजभवन प्रधानमंत्री कार्यालय नाव बदलत आहे. मागील दोन चार वर्षात पेगासेस बाबत ऐकत होता. तुम्ही लक्षात घ्या पेगासेस नाव बदलून यांनी आता संचारसाथी नाव ठेवलं आहे. त्यांनी आपल्याच लोकांवर अविश्वास दाखवायला सुरुवात केली आहे. त्यांनी दहशतवाद्यांवर लक्ष ठेवायला पाहिजे  निवडणूक सुरू आहे त्यांची लोकं त्यांच्याच लोकांवर धाडी टाकत आहे. हेलिकॉप्टर मधून बॅगा कशा जात होत्या हे आपण पहिल आहे. घोटाळ्यातून सगळेजण आता जागे होत आहे शिवसेनेचा असल झेंडा आपल्याला दिसायला हवा. भगव्यावर आता कोणतही चिन्ह नको आहे. शिवाजी महाराजांचा भगवाच आता दिसायला हवा

Comments are closed.