आता फक्त भाजपचेच नारे द्यायचे का? जय हिंद, वंदे मातरमच्या घोषणांच्या बंदीवरून आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

राज्यसभेने अधिवेशनापूर्वी जारी वकेलेल्या बुलेटिनमधून सभागृहात भाषणानंतर वंदे मातरम, जय हिंद अशा घोषणा न देण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारच्या या आदेशावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

आज शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी व अरविंद सावंत हे उपराष्ट्रपतींना भेटले व त्यांनी राज्यसभेत ‘जय हिंद’ व वंदे मातरम बोलण्यावर जी बंदी घातली आहे त्याविरोधात आवाज उठवला. या दोन घोषणांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि आजही या घोषणा आपल्यात देशभक्तीची भावना जागृत करतात. भाजप सरकारने यावर बंदी का आणली हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. आता फक्त भाजपचेच नारे द्यायचे का? देशाचा जयजयकार चालणार नाही का? असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत व प्रियांका चतुर्वेदी यांनी बुधवारी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जय हिंद, वंदे मातरमच्या घोषणावरील बंदी मागे घ्यावी व या घोषणांचा विरोध केला म्हणून सरकारने माफी मागावी अशी मागणी त्यांनी उपराष्ट्रपतींकडे केली.

Comments are closed.