शमी दुर्लक्षित, रिंकू सिंगचाही पत्ता कट! दक्षिण आफ्रिका विरुद्ध टी20 मालिकेसाठी टीम इंडियातून हे 5 खेळाडू बाहेर!
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. हार्दिक पांड्या (Hardik pandya) तंदुरुस्त होऊन संघात परतला आहे. त्याचबरोबर, शुबमन गिलला (Shubman gill) संघात स्थान मिळाले असून, त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, गिल फिटनेस चाचणी (Fitness Test) उत्तीर्ण झाल्यावरच या मालिकेत खेळताना दिसेल.
परंतु, काही खेळाडू असे आहेत ज्यांना निवडकर्त्यांनी (Selectors) पुन्हा एकदा डावलले आहे.
मोहम्मद शमी
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohmmed Shami) निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा दुर्लक्षित केले आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या संघात शमीला संधी मिळालेली नाही. शमी भारतीय जर्सीमध्ये शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला होता.
रिंकू सिंग
रिंकू सिंगलाही (Rinku Singh) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठीच्या 15 सदस्यीय संघात जागा मिळालेली नाही. रिंकूला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात घेण्यात आले होते, पण त्याला फक्त एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. रिंकूला संघातून बाहेर काढण्याचा हा निर्णय नक्कीच थोडा आश्चर्यकारक आहे.
नितीशकुमार रेड्डी
नितीश कुमार रेड्डीलाही टी-20 संघात स्थान मिळालेले नाही. याचे कारण म्हणजे हार्दिक पांड्या तंदुरुस्त होऊन संघात परतला आहे, त्यामुळे नितीशला संघात घेण्यात आले नाही. नितीशची कामगिरी गेल्या काही काळात विशेष राहिलेली नाही. याच कारणामुळे निवडकर्त्यांनी यावेळी त्याच्यावर विश्वास दाखवला नाही.
ऋतुराज गायकवाड
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत फलंदाजीने धमाल माजवणारा ऋतुराज गायकवाड (Ruturaj gaikwad) पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरला आहे. ऋतुराजला 15 सदस्यीय संघात जागा मिळालेली नाही. देशांतर्गत क्रिकेट (Domestic Cricket) आणि इंडिया-ए (India-A) कडून ऋतुराजने शानदार कामगिरी केली आहे, तरीही त्याला टी-20 संघात स्थान मिळालेले नाही.
ऋषभ पंत
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऋषभ पंतलाही (Rishbh Pant) संघात ठेवण्यात आलेले नाही. वनडे संघात निवड झाल्यानंतर पंतला टी-20 मध्येही आपल्या फलंदाजीने कमाल दाखवण्याची संधी मिळेल, असे मानले जात होते. मात्र, टी-20 संघात परतण्यासाठी पंतला अजून प्रतीक्षा करावी लागेल.
Comments are closed.