निवडणुकीत वाद होतातच, म्हणून काय गुन्हा दाखल करणार का? गद्दार आमदार संजय गायकवाड यांच्याकडून बोगस मतदार पळवल्याचे समर्थन

निवडणुकीत वाद होतातच, म्हणून काय गुन्हा दाखल करणार का? असा उफराटा सवाल करीत गद्दार आमदार संजय गायकवाड यांनी बोगस मतदाराला पळवल्याचे समर्थनच केले. त्या तरुणाने विनंती केली म्हणून आपल्या मुलाने त्या तरुणाला वाचवल्याचा दावाही आमदार गायकवाड यांनी केला.
नगर परिषद निवडणुकीसाठी बोगस मतदान करताना काही जागरूक नागरिकांनी एका तरुणाला पकडले. बेदम मारहाण करून त्या तरुणाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मात्र आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल आणि त्याचा साथीदार श्रीकांत गायकवाड या दोघांनी पोलिसांच्या ताब्यातून त्या तरुणाला पळवून नेले. या प्रकरणी कुणाल आणि श्रीकांतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्याने जळफळाट झालेल्या आमदार गायकवाड यांनी ‘हे बुलढाणा आहे का बिहार ?’ असा प्रश्न केला. मतदार याद्यांमध्ये घोळ होता. मतदारांना एका केंद्रावरून दुसर्या केंद्रावर पाठवण्यात येत होत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाद झाला. ज्या तरुणाला बोगस मतदार म्हणून पकडले त्याने कुणालकडे मदतीची विनंती केली. त्यामुळे माझ्या मुलाने त्याला वाचवले, असा दावा आमदार गायकवाड यांनी केला.

Comments are closed.