बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर गडगडला, सलग पाचव्या दिवशी घसरण,सरकार बँकेतील 6 टक्के भागीदारी विकणार
भारत सरकारनं बँक ऑफ महाराष्ट्रमधील 6 टक्के भागीदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही भागीदारी ऑफर फॉर सेलद्वारे विकली जाणार आहे. आज रिटेल गुंतवणूकदारांसाठी ऑफर फॉर सेल सुरु होताच बँकेचा शेअर 2 टक्क्यांनी घसरला.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेअरमध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण सुरु झाली आहे. शेअरची विक्री 2 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ इन्वेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंटचे सचिव अरुणिश चावला यांनी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफर फॉर सेल आज नॉन रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुला झाल्याचं काल म्हटलं होतं.

रिटेल गुंतवणूकदारांना आजपासून बोली लावता येणार आहे. रिटेल गुंतवणूकदार 3 डिसेंबर पासून बोली लावू शकणार आहेत. सरकार बँकेतील 5 टक्के इक्विटी विकणार आहे. तर, ग्रीन शॉ ऑप्शनसह 1 टक्के अतिरिक्त विक्री केली जाणार आहे. ऑफ फॉर सेल च्या साईजच्या तुलनेत 400 टक्के सबस्क्राइब झाला आहे.

सरकारनं ऑफर फॉर सेल द्वारे शेअर विक्रीसाठी फ्लोअर प्राईस 54 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. त्यानुसार त्याची किंमत 2200 कोटी रुपये होते. ग्रीन ऑप्शनमधून सरकारला 400 कोटी रुपये अतिरिक्त मिळणार आहेत.

सप्टेंबर ला संपलेल्या तिमाहीतील शेअर होल्डिंग डेटानुसार केंद्राची बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 79.6 टक्के भागीदारी असून 612.26 कोटी शेअर आहेत. इतर 156.89 शेअर म्हणजेच 20.4 टक्के शेअर सार्वजनिक शेअर होल्डर्सकडे आहेत.

ऑफर फॉर सेलद्वारे शेअर विक्री केल्यानं बँक ऑफ महाराष्ट्रमधील केंद्र सरकारची भागीदारी 75 टक्क्यांपेक्षा कमी होईल. सार्वजनिक शेअर होल्डिंग 25 टक्क्यांवर जाईल. जे सेबीच्या नियमानुसार अपेक्षित आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सार्वजनिक बँकांमध्ये विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढवण्याबाबत विचार करत नसल्याचं म्हटलं.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
येथे प्रकाशित : 03 डिसेंबर 2025 10:26 PM (IST)
व्यापार-उद्योग फोटो गॅलरी
आणखी पाहा
Comments are closed.