Maharashtra Live Blog Updates: निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरुमबाहेर राडा

Maharashtra Live Blog Updates: बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम असलेल्या नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झालीय. त्यामुळे नगर परिषदेसमोर तणावाचं वातावरण निर्माण झालंय. बुधवारी रात्री 11 वाजता दीपक देशमुख हे नगर परिषदेत स्ट्रॉंग रुमची पाहणी करण्यासाठी गेले असता नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय. यावेळी नगरपरिषदेसमोर मोठ्या प्रमाणात देशमुख समर्थक जमा झाले. यावेळी दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

Comments are closed.