भुयारी मार्गांचे काम अंतिम टप्प्यात, मार्चमध्ये गर्डर बसवणार;शीव उड्डाणपुलावरून जूनपासून वाहतूक!

शीव उड्डाणपुलाचे काम सध्या वेगाने सुरू असून रेल्वे हद्दीमधील काम रेल्वे विभाग तर पोहोच रस्ते, पादचारी मार्ग अशी कामे पालिका प्रशासनाकडून केली जात आहेत. या कामात दोन्ही भुयारी मार्गांचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर मार्चमध्ये गर्डर बसवल्यानंतर मेअखेरपर्यंत काम पूर्ण होऊन 1 जूनपासून शीव उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

शीव उड्डाणपुलाच्या कामासंबंधी पालिका प्रशासनासह वाहतूक पोलीस, रेल्वे विभागाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पुलाच्या बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी वाहतूक पोलीस सहआयुक्त अनिल पुंभारे उपस्थित होते.

असे होणार काम…

-धारावी आणि लाल बहादूर शास्त्राr मार्गाकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांची कामे दिनांक 15 एप्रिलपर्यंत पूर्ण केली जातील. त्यानंतर पूर्व बाजूच्या रस्त्याची कामे सुरू करण्यात येतील.
– हे काम पूर्ण करण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी आवश्यक आहे.

हँकॉक ब्रीजची कामे अंतिम टप्प्यात

मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची पुनर्बांधणी पूर्ण झाली असून एक बाजू वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडची कामेही अंतिम टप्प्यात असून तांत्रिक आणि न्यायालयीन प्रकरणांत काही कामे अडचणींमुळे बाकी आहेत.

Comments are closed.