महायुती सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, विरोधकांनी पत्र दाखवून उघड केला फडणवीसांचा खोटारडेपणा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यास दोन महिने उशीर केल्यामुळे राज्यातील महायुती सरकार विरोधकांच्या टीकेच्या रडारवर आले आहे. विरोधकांनी पत्र दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खोटारडेपणा आज उघड केला. या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली.

राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी प्रस्ताव तयार करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी 7 ऑक्टोबरला सांगितले होते. प्रत्यक्षात तो 27 नोव्हेंबरला पाठवण्यात आला. याचा पुरावा म्हणून सरकारचे पत्रच रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले. मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल केली असून त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

या सरकारचे प्राधान्य शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीला नाही तर निवडणूक प्रचाराला आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

‘सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. केवळ बेइमानी करून निवडणुका जिंकणे हेच यांचे काम आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Comments are closed.