Pregnancy Healthcare: बाळाच्या जन्मानंतर मासिक पाळी कधी येते? विलंब झाल्यास ठरू शकतं घातक
प्रसूतीनंतर स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होतात. हार्मोनल चढउतार, स्तनपान, ताण, झोपेचा अभाव याचा शरीरावर परिणाम होतो. त्यामुळं प्रसूतीनंतर येणारी मासिक पाळी लांबू शकते. ते स्त्रियांच्या आरोग्यासाठी धोक्याचं मानलं जातं. अशावेळी प्रसूतीनंतर मासिक पाळी कधी येते आणि ती विलंब झाल्यास काय धोके असतात ते जाणून घेऊया..
प्रसूतीनंतर मासिक पाळी कधी येते?
नॉर्मल किंवा सी-सेक्शन प्रसूतीनंतर ६ ते ८ आठवड्यांच्या आत मासिक पाळी येते. मात्र जर आई एक्सक्लुसिव्ह ब्रेस्टफीडिंग करत असेल तर ४-६ महिने पाळी येत नाही. एक्सक्लुसिव्ह ब्रेस्टफीडिंग म्हणजे बाळाला पहिल्या ६ महिन्यांपर्यंत फक्त आईचे दूध पाजणे, या काळात बाळाला इतर काहीच दिले जात नाही, अगदी पाणीही नाही. एक्सक्लुसिव्ह ब्रेस्टफीडिंगमुळे प्रोलॅक्टिन हार्मोन सक्रिय असतात, ज्यामुळं दुधाचे उत्पादन होते आणि ओव्हुलेशन कमी होते. त्यामुळंच या परिस्थितीत मासिक पाळी उशिरा येण्याची शक्यता जास्त असते.
आता जर तुम्ही एक्सक्लुसिव्ह ब्रेस्टफीडिंग करत नसाल आणि प्रसूतीनंतर तीन महिन्यांच्या आत तुमची मासिक पाळी आली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या महिलांची मासिक पाळी उशिरा आल्यास सामान्य आहे. याशिवाय प्रसूतीच्या तीन महिन्यांनंतर मासिक पाळी न आल्यास महिलांना तीव्र वेदना, चक्कर, थकवा जाणवत असेल तर त्यांनीही तपासणी करणे आवश्यक आहे. अशावेळी थायरॉईड, पीसीओएस, हार्मोनल असंतुलन किंवा संसर्ग झाल्याने मासिक पाळी लांबलेली असू शकते. त्यामुळं त्यावर वेळीच उपचार घेणं महत्त्वाचं आहे.
Comments are closed.