करार झाला, जाहिरातबाजी केली, मंत्र्यांचे दौरे झाले पण एकही कुशल कामगार जर्मनीला गेला नाही; आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टीका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी जर्मनी रोजगार करारावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, जर्मनीमध्ये महाराष्ट्रातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी MoU करण्यात आला, जाहिरातींवर मोठा खर्च करण्यात आला आणि त्यासाठी मंत्री परदेश दौऱ्यावर गेले, मात्र या सर्व प्रक्रियेनंतरही आजपर्यंत एकही प्रशिक्षित उमेदवार जर्मनीला पाठवला गेलेला नाही. त्यांनी हा प्रकल्प “शून्य नियोजन, शून्य अंमलबजावणी आणि शून्य परिणाम” असा ठरल्याचा आरोप केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, माजी शिक्षणमंत्र्यांवरच्या शालेय गणवेशात अनियमितते प्रकरणी अद्याप चौकशी झाली नाही. या सर्वातून राज्यातील जनतेचा पैसा जाहिराती, परदेश दौरे आणि फक्त घोषणांवर खर्च केला जात आहे. आपल्या राज्यातच रोजगार देऊ न शकणारे सरकार परदेशात रोजगार देण्याचे आश्वासन कसे देऊ शकते आणि या प्रकल्पाचा निकाल शून्य असताना सरकार किंवा संबंधित मंत्री अजूनही शांत का आहेत? तसेच या प्रकरणाबाबत राज्य सरकारने तातडीने उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
केवळ सामंजस्य करार, करदात्यांचे पैसे जाहिरातींवर आणि मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर खर्च केले जातात.
परिणाम- शून्य.शालेय मुलांच्या गणवेशावर राज्याचा घोळ (घोटाळा केला नसला तर) केला असे म्हणणाऱ्या माजी शिक्षणमंत्र्यांचा आणखी एक शून्य निकाल आहे- शून्य कुशल… pic.twitter.com/jDgBRedOZg
— Aaditya Thackeray (@AUThackeray) ४ डिसेंबर २०२५

Comments are closed.