Maternity Photoshoot: मॅटरनिटी फोटोशूटसाठी आऊटफिट घेताय? मग ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष
मॅटरनिटी फोटोशूटचा आजकाल प्रचंड ट्रेंड आहे. नुकतंच प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगने मॅटर्निटी फोटोशूट केलं. यावेळी तिने निळ्या रंगाचा गाऊन घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. मॅटरनिटी फोटोशूट हा एखाद्या स्त्रीसाठी सुंदर अनुभव असतो. त्यामुळं या दिवसासाठी तुम्ही कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. त्यासाठी जर तुम्ही आऊटफिट निवडत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्या. ( How to choose outifit for maternity photoshoot )
प्रेग्नन्सीच्या काळात स्त्रियांमध्ये अनेक शारीरिक बदल होतात. त्यामुळं आरामदायी, सैल कपडे निवडावे. या काळात शरीराचा आकार सतत बदलत असतो, म्हणून कपडे सैल किंवा स्ट्रेचेबल फॅब्रिकचे असावेत. तसेच पोटावर दाब पडू नये याची काळजी घ्यावी. कॉटन ब्लेंड्स किंवा मखमलीसारख्या स्ट्रेचेबल मटेरियलपासून बनवलेले हलके कपडे मॅटर्निटी शूटसाठी निवडावे.
फोटोशूटसाठी कपड्यांचा रंग महत्त्वाची भूमिका बजावतो. याप्रसंगी नेहमी पेस्टल रंगाचे कपडे क्लासिक आणि सुंदर लूक देतात. पांढरा, गुलाबी, मिंट किंवा लाईट ब्लू असे हलके रंग फोटोशूटसाठी योग्य ठरतात. जर तुम्हा डार्क रंग हवे असतील तर लाल, सोनेरी किंवा रॉयल ब्लू असे चमकदार रंग निवडावे.
कपडे निवडताना मटेरियलकडे विशेष लक्ष द्या. जसे की, कॉटन, आणि जॉर्जेटसारखे हलके आणि मऊ कापड फोटोशूटसाठी चांगले पर्याय ठरतात. याशिवाय जास्त आकर्षक आणि ग्लॅमरस लूकसाठी सिल्क आणि मखमलीचे कपडेही योग्य ठरतात. तसेच फार जड कपडे घालू नये, यामुळं ते कॅरी करणं अवघड जातं. मॅटर्निटी शूट दरम्यान बेबी बंप हायलाईट करण्यासाठी आकर्षक बेल्टही वापरू शकता.
Comments are closed.