‘शक्ती’ नंतर आता राणीच्या बागेतील ‘रुद्र’ या वाघाचा मृत्यू, दहा दिवसातली दुसरी घटना

महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ‘शक्ती’ वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता ‘रुद्र’ वाघाचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रुद्रचा मृत्यू हा शक्तीच्या आधी झाल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.
रुद्र हा शक्ती व करिष्मा या वाघिणीचा बछडा होता. रुद्रचा मृत्यू इन्फेक्शनमुळे झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता प्राणीसंग्रहालयाने रुद्रच्या मृत्यूची माहिती उद्यान व्यवस्थापनाकडून का लपवली याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments are closed.