सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद

मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत असून एकापाठोपाठ एक जोडपे लग्नबंधनात अडकत आहे. बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणने संजना गोफणेशी लग्न केले.

सूरजनंतर 2 डिसेंबर रोजी प्राजक्ता गायकवाड-शंभुराज खुटवड आणि सोहम बांदेकर-पूजा बिरारी हेही लग्नबंधनात अडकले. त्यानंतर आज आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा विवाहन संपन्न झाला.

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत लग्न केलं. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला, सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

आमदार सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांच्यासोबत 26 ऑक्टोबर रोजी तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर, तिच्या मेहंदी आणि हळदी सोहळ्याचेही खास फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.

आता, दोघेही विवाहबंधनात अडकले असून तेजस्विनीने गुलाबी रंगाची पैठणी नेसल्याचं दिसून येत आहे. वधूच्या गेटअपमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. तर समाधान यांनी ऑफव्हाइट रंगाचा शेरवानी परिधान केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेत्री निर्माती तेजस्विनी लोणारी आणि शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्या लग्नाला उपस्थित राहून नव्या वाटचालीसाठी  खास शुभेच्छा दिल्या.

शिवसेना पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर आणि अभिनेत्री निर्माती तेजस्विनी लोणारी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला, मुंबईत हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे.

मंदार शिंदे यांच्या नो प्रॉब्लेम या चित्रपटातून तेजस्विनी लोणारीने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर, मकरंद अनासपुरेसोबत दोघात तिसरा आता सगळं विसरा, गुलदस्ता चित्रपटातही ती झळकली होती.

देवमाणूस या मालिकेतून तिने घराघरात, मनामनात आपलं स्थान निर्माण केलं होतं, आज सरवणकर कुटुंबीयांची सून झाल्याने तेजस्विनी आता राजकीय कुटुंबीयांशी जोडली गेली आहे.

दरम्यान, तिच्या लग्नासाठी आशीर्वाद देण्यास मराठी कलाकार आणि राजकीय नेते मंडळींची उपस्थिती होती. शिवसेना युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनीही भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.

येथे प्रकाशित : 04 डिसेंबर 2025 05:02 PM (IST)

मुंबई फोटो गॅलरी

आणखी पाहा

Comments are closed.