NZ vs WI 1ली कसोटी: रचिन रवींद्र-टॉम लॅथमची स्फोटक शतके, वेस्ट इंडिजवर न्यूझीलंडची आघाडी 500 धावांच्या जवळ
दिवसअखेर विल यंग (21) आणि मायकेल ब्रेसवेल (6) नाबाद राहिले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.
दिवसअखेर विल यंग (21) आणि मायकेल ब्रेसवेल (6) नाबाद राहिले.
तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा संघ बिनबाद 32 धावांनी पुढे आला. त्यानंतर डेव्हॉन कॉनवे (37) आणि केन विल्यमसन (9) 100 धावा पूर्ण करून पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर रवींद्र आणि लॅथमने डावाची धुरा सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी 328 चेंडूत 279 धावांची भागीदारी केली.
रवींद्रने 185 चेंडूत 27 चौकार आणि 1 षटकार मारत 176 धावा केल्या. तर लॅथमने 3 वर्षांनंतर पहिले शतक झळकावले आणि 250 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 145 धावा केल्या. या शतकी खेळीदरम्यान, लॅथमने कसोटी क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण केल्या आणि हा आकडा गाठणारा न्यूझीलंडचा पाचवा क्रिकेटपटू ठरला. त्याच्या आधी हा पराक्रम केन विल्यमसन, रॉस टेलर, स्टीफन फ्लेमिंग आणि ब्रेंडन मॅक्युलम यांनीच केला होता.
वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावात केमार रोच आणि ओजे सील्स यांनी २-२ बळी घेतले.
या सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने 231 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा डाव 167 धावांवर आटोपला आणि न्यूझीलंडने 64 धावांची आघाडी घेतली.
संघ
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, विल यंग, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, झाकरी फॉक्स, मॅट हेन्री, जेकब डफी.
वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): तेजनारिन चंदरपॉल, जॉन कॅम्पबेल, ॲलेक अथानाजे, शाई होप, रोस्टन चेस (सी), जस्टिन ग्रीव्हज, टेविन इम्लाच (विकेटकीपर), केमार रोच, जोहान लेन, जेडेन सील्स, ओजे शिल्ड्स.
Comments are closed.