जालन्यातील कौचलवाडी गांजाच्या शेतीवर पोलीसांचा छापा, एक कोटीचा मुद्देमाल जप्त

जालन्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी गावभागातील शेतात गांजाच्या शेतीवर अंबड पोलीस व एटीएस पथकाने कारवाई करुन तब्बल एक कोटीचा गांजाचे झाडे पकडली आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आज ४ डिसेंबर रोजी उशीरा करण्यात आली.

एटीएस पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड व अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अंबड तालुक्यातील कौचलवाडी या गावात एका व्यक्तीने गांजाची शेती केली असून सध्या गांजाची काढणी सुरु आहे. त्या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, सहाय्यक फौजदार शेख अकतर, पोलीस हवालदार विनोद गडदे, मारुती शिवरकर, कैलास कुरेवाड, यशवंत मुंढे, राधाकृष्ण हरकळ, दीपक बडूरे यांनी मिळालेल्या माहितीनुसार कौचलवाडी येथे जावून शोध घेतला असता ढवळीराम बारकू चारावंडे यांच्या शेतात गट क्र. ७८७ कौचलवाडी शिवार येथे जवळपास ४ क्विंटल गांजाची झाडे पाला, फुले काढणी करतांना ती सुकविताना तसेच उभी झाडे असा मुद्देमला मिळून आल्याने पंचनामा करून तो ताब्यात घेण्यात आला. हा मुद्देमाल सुमारे एक कोटीच्या अधिक असू शकतो, असेही सांगण्यात येत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ,पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, सहाय्यक फौजदार शेख अकतर, पोलीस हवालदार विनोद गडदे, मारुती शिवरकर,कैलास कुरेवाड, यशवंत मुंढे, राधाकृष्ण हरकळ, दीपक बडूरे आदींनी केली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Comments are closed.