या गावात आहे चक्क शिव्या देण्याची प्रथा, वाचा कुठं आहे हे गाव?

आपल्याला कोणी शिवी दिली तर साहजिकच तळपायाची आग मस्तकात जाते. मग आपणही समोरच्याला दोन-चार शिव्या घालतो. शिव्या घालून मन शांत झालं की पुन्हा जो तो आपल्या मार्गाला निघतो. Gen Z पिढीनुसार शिव्या देणं कूल असलं तरी शिव्या देणं चुकीचं आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की महाराष्ट्रात अशी गाव आहेत जिथे शिव्या देण्याची अनोखी प्रथाच पार पडते. चला जाणून घेऊयात महाराष्ट्रात कुठे ही परंपरा संपन्न होते.

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड आणि बोरी या ठिकाणी शिव्या देण्याची अनोखी प्रथाच पार पडते. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी हा सोहळा रंगतो. गेल्या अनेक वर्षांपासून सुखेड आणि बोरी गावातील महिला एका ओढ्याच्या ठिकाणी जमा होऊन एकमेकांना शिव्या देतात. यात विविध प्रकारच्या शिव्या दिल्या जातात. प्रथेदरम्यान दिल्या जाणाऱ्या शिव्या कोणाला ऐकू येऊ नये यासाठी पारंपरिक वाद्य वाजवली जातात.

शिव्या देण्याची ही प्रथा पार पडण्यामागे एक कथा सांगितली जाते, त्यानुसार सुखेड आणि बोरी गावातील दोन सुना नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ओढ्यावर गेल्या. येथे त्यांची जोरदार भांडणे झाली आणि ओढ्यात पडून त्यांचा मृत्यु झाला. त्यानंतर दोन्ही गावांमध्ये काही ना काही अघटीत घटना घडू लागल्या. याबाबत गावकऱ्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला. दोन्ही गावातील लोकांनी एकत्र येत एकमेकांना शिव्या देण्याच ठरवलं. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. ही प्रथा पाहण्यासाठी जिल्ह्यातल्या अनेक भागातून लोक या ठिकाणी येतात. ही प्रथा पाळली नाही तर गावावर रोगराई पसरते, अशी या महिलांची समजूत आहे. पण, ही प्रथा ऐकायला विचित्र वाटत असली तरीपार पडताना महिला पोलीस आणि गावकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडते एवढं मात्र नक्की..

हेही वाचा – टच डब्ल्यूओडी : जेव्हा तुम्ही चांगले वाक्यांश म्हणता तेव्हा तुम्ही तावडे म्हणता?

Comments are closed.