Tanning Removal Tips: २० मिनिटांतच टॅनिंग करा दूर; बेसनात हे घटक मिसळून बनवा फेस पॅक
बाहेरील धूळ, प्रदूषण आणि सूर्यप्रकाशामुळं अनेकदा चेहरा टॅन होतो. हे टॅनिंग चेहरा आणि हातांवर दिसून येते. कारण टॅनिंगमुळं त्वचा काळवंडते. त्यातच आता लग्नसराईचे दिवस आहेत. घरात एखादं कार्य असेल तर मग हे टॅनिंग कसं कमी करायचं हा प्रश्न पडतो. अशा वेळी अनेक जण पार्लरमध्ये फेशियल करतात. पण त्यासाठी भरपूर वेळ आणि पैसे दोन्ही लागतं. अशा परिस्थितीत नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी मानले जातात. तुम्ही बेसनापासून फक्त २० मिनिटांत एक उपाय केल्यास तुमचं टॅनिंग त्वरित कमी होईल. ( Tanning Removal Natural And Homemade Face Pack )
बेसनात काही घटक मिसळून तुम्ही एक फेस मास्क बनवू शकता. अगदी घरच्या घरी असलेले घटक वापरून तुम्ही हा फेस मास्क बनवून चेहऱ्यावर लावल्यास टॅनिंग कमी होईल. त्यासाठी २ चमचे बेसन, १ चमचा मुलतानी माती, कॉफी पॅकेट, ८-१० थेंब लिंबाचा रस, २ चमचे दही इतकं मोजकं साहित्य लागतं.
हा फेस मास्क बनवणे खूप सोपे आहे. एका भांड्यात वरील सर्व साहित्य मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. २० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर तुम्हाला त्वरित परिणाम दिसतील. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय केल्यास तुम्हाला फरक लवकर जाणवेल.
असे आहेत फायदे:
बेसन त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि त्वचा उजळण्यास मदत करते. तर मुलतानी मातीमुळे त्वचा उजळते. कॉफीमुळे त्वचेचा निस्तेजपणा दूर होतो आणि नैसर्गिकरित्या चमक येते. तर लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी निस्तेजपणा कमी करण्यास मदत करते.
Comments are closed.