वनडे मालिका संपल्यानंतर 6 दिवसांनी रोहित शर्मा करणार चौकार-षटकारांचा वर्षाव! 'या' स्पर्धेत घालणार धुमाकूळ
रोहित शर्मा सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले होते, पण दुसऱ्या सामन्यात त्याची बॅट चालली नाही. आता (6 डिसेंबर २०२५) रोजी विशाखापट्टणम (Vizag) येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाईल. चाहत्यांना वाटत आहे की यानंतर रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतच पाहता येईल. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर अवघ्या 6 दिवसांनी रोहित शर्मा पुन्हा मैदानावर परतणार आहे.
नुकत्याच आलेल्या टाईम्स ऑफ इंडियाच्या (TOI) रिपोर्टनुसार, रोहित शर्माने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोहितने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि तो फक्त आयपीएल (IPL) खेळतो. मात्र, त्याला मुंबईसाठी देशांतर्गत टी20 स्पर्धा खेळायची आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील एका सूत्राने याबाबत माहिती दिली आहे. मुंबईला नक्कीच वाटेल की रोहितने त्यांच्यासाठी खेळावे, ज्यामुळे त्यांचे ही ट्रॉफी जिंकण्याचे अव्हान वाढेल. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे नॉकआऊट सामने 12 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत आणि मुंबईचे नॉकआऊट्ससाठी पात्र होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. अशा प्रकारे, रोहित एकदिवसीय मालिका संपल्यानंतर अवघ्या सहा दिवसांनी पुन्हा चौकार-षटकारांचा वर्षाव करू शकतो.
रोहित शर्माने त्याचा शेवटचा टी20 सामना (1 जून) रोजी खेळला होता. आयपीएल 2025 (IPL 2025) च्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात तो खेळला होता आणि त्यानंतर तो टी20 क्रिकेटपासून दूर आहे. आता शर्मा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
रोहित शर्मा केवळ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे नॉकआऊट सामनेच नाही, तर विजय हजारे ट्रॉफी देखील खेळू शकतो. 24 डिसेंबरपासून हा एकदिवसीय (वनडे) फॉर्मेटचा टूर्नामेंट सुरू होत आहे आणि रोहित शर्मा स्वतःला मॅच फिट ठेवण्यासाठी यात सहभागी होईल. मुंबईसाठी ही खूप चांगली बातमी आहे. त्यांना या दोन्ही प्रमुख टूर्नामेंटमध्ये रोहित शर्माची साथ मिळेल.
Comments are closed.