सातारा-कोल्हापूर महामार्गाला गती

सातारा–कोल्हापूर महामार्गाला गती

सातारा : पुणे ते सातारा आणि पुढे कोल्हापूरपर्यंतच्या आशियाई महामार्गाच्या कामाला गती मिळणार असून हे काम एका वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी या महामार्गाच्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री गडकरी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. गडकरी म्हणाले की, पुणे- सातारा मार्गासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयारकरण्यात आला आहे. कामात झालेल्या विलंबामुळे जुन्या ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आले असून नवीन टेंडर प्रक्रिया सुरू आहे. खंबाटकी घाटातील जुन्या बोगद्याशेजारी नव्याने दोन बोगदे बांधण्याचे काम वेगाने सुरू असून त्यापैकी एक बोगदा लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

येत्या आठवड्यात या कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे-सातारा-कोल्हापूर प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभहोणार असल्याचेही मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत स्पष्ट केले.

Comments are closed.