DDLJ सिनेमाला 30 वर्ष झाली, लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये उभारला राज-सिमरनचा ब्रॉन्झ पुतळा

1995 च्या दशकातील आयकॉनिक सिनेमा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर जगभरात पसंती मिळाली होती. आता या आयकॉनिक सिनेमाला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने लंडनच्या लीसेस्टर स्क्वायरमध्ये DDLJच्या राज आणि सिमरनचा एक कांस्य पुतळा तयार करण्यात आला. या कार्यक्रमात शाहरुख खान आणि काजोल यांनी त्यांच्या या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी दोघंही भावूक झाले.
शाहरुख खान म्हणाला की, डीडीएलजे हा फार जवळचा सिनेमा आहे. तर काजल म्हणाली, विश्वास बसत नाही की सिनेमाच्या तीस वर्षानंतरही एवढं प्रेम मिळतय.
बडे बडे देशों में, ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं, सेनोरिता!
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) ची ३० वर्षे साजरी करत आज लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरवर राज आणि सिमरन यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करताना खूप आनंद झाला!
डीडीएलजे ही पहिली भारतीय आहे याचा विलक्षण आनंद झाला… pic.twitter.com/8wjLToBGYc
— शाहरुख खान (@iamsrk) ४ डिसेंबर २०२५
शाहरुख खानने या इव्हेंटचे फोटो शेअर करत, ‘बड़े बड़े देशों में, ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं, सेनोरिटा. अशी सुरुवात केली आहे. आज लंडनच्या लीसेस्टर स्क्वायरमध्ये राज आणि सिमरनच्या बॉन्झ पुतळ्याचे अनावरण करताना खूप आनंद होत आहे. दिलवाले दुल्हनीया ले जाएंगे सिनेमाला 30 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जल्लोष. खूप आनंद होत आहे की, बॉलीवूडसाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे, पहिल्यांदाच एखाद्या हिंदुस्थानी चित्रपटाला लेस्टर स्क्वेअरमध्ये पुतळा देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हे शक्य करण्यासाठी लंडनमधील त्या प्रत्येकाचे आभार मानतो. तुम्ही लंडनमध्ये जाणार असाल तर राज आणि सिमरनला नक्की भेट द्या. तुम्ही डीडीएलजेसोबत आणखी आठवणी बनवा.

Comments are closed.