Ratnagiri News – आंबा घाटात खासगी प्रवासी बस दरीत कोसळून भीषण अपघात; ३७ प्रवासी जखमी, आठ गंभीर

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणा जवळील दरीत खाजगी प्रवासी गाडी कोसळून अपघात झाल्याची घटना आज सकाळी अंदाजे साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली

मिळालेल्या माहिती नुसार १ डिसेंबर २०२५ रोजी नेपाळ येथून नि ११० महिला पुरुष प्रवाशांना घेऊन निघालेली खाजगी बस एम पी १३ पी १३७१ आज पहाटे आंबा घतातील चक्रीवळणाजवळ आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सुमारे पन्नास फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३७ प्रवासी जखमी झाले असून त्यातील आठ जण गंभीर जखमी आहेत.अपघाताचे वृत्त कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश कदम व देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे व साखरपा पोलीस कर्मचारी यांनी तातडीने अपघात झाल्या ठिकाणी धाव घेऊन जखमीना बाहेर काढले व प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे उपचारासाठी आणले त्यात ३७ प्रवासी जखमी असून आठ प्रवासी गंभीर जखमी आहेत सर्व जखमीना रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहेत

लहान मुलांचा देखील यात समावेश आहे. अपघाताचे गांभीर्य ओळखून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रतिक मेनकर डॉ. सृष्टी डोर्ले, १०८ च्या डॉ. रुपाली माने, कर्मचारी भारती गुरव, सुप्रिया गावडे, निवास मुंडे, प्रसाद पाटील तसेच चालक महेश रेडीज, मंदार शिंदे, रामदास मुकनर, वैभव आंबवकर, शिपाई विष्णू खामकर, विकास कदम यांनी तत्काळ जखमी रुग्णांना उपचारासाठी मदत केली

यामध्ये डेलियन चौधरी (वय 28), सुनील चौधरी (वय 31), खुशीराम (वय 39), जीवन परिवार (20), नीरजल (24) देबा बीके (60), गिरसिंग धामी (50), मुलायम सिंग (33), देवमा धामी (48), जसबीर थापा (47), वेनेर थापा (47), नेपाळ (47), वी. बहादूर मगर (44), दामर ठाकूर (39), वीरेंद्र सिंग. तोमर (48), तोयनाथ खामे (45), साहनील दीड वर्षा गीता मगर (50), ज्ञानबर मगर (52) बीर बहादूर मगर (67), शेर सारथी (50), बंडू थारू (70), तेज ठाकूर (52), भागीराम चौधरी (36), किशोर थारू (35), राम चौधरी (35), राम चौधरी (35) नारायण गिरी (60) कलसू चौधरी (55) अशी आठ जखमींची नावे आहेत. जखमी होड्या समजू शकल्या नाहीत.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश कदम पोलीस निरीक्षक उदय झावरे देवरुख व साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्य्क पोलीस फौंजदार शांतातम पंदेरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय करंडे पोलीस कॉन्स्टेबल अमोल दळवी नितीन पवार स्वप्नील कांबळे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर कॉन्स्टेबल रेणुका कांबळे रेश्मा चव्हाण, पोलीस पाटील रवींद्र फोंडे आदिनी घटनास्थळी जाऊ न जखमीना मदत करून सुखरूप बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्यास मोलाचे सहकार्य केले असून पोलीस कार्यवाही सुरु आहे

Comments are closed.