दुशेरेच्या प्रकिष्टा पाटीलचा एरोनॉटिकल इंजिनीअरिंगचा प्रेरणादायी प्रवास

दुशेरेच्या प्रतीक्षा पाटीलचा वैमानिक अभियांत्रिकीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

विकास जाधव यांनी

दुशेरे : कराड तालुक्यातील दुशेरे या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील प्रतीक्षा संजय पाटील ही आज ग्रामीण भागातील मुलींसाठी नव्या उंचीचे प्रतीक ठरत आहे. साध्या कुटुंबातून येत असूनही तिने जिद्द, कष्ट आणि स्वप्नांना धरून ठेवण्याची ताकद दाखवत वैमानिक अभियांत्रिकीपर्यंतचा प्रवास गाठला आहे.

प्रतीक्षाचे प्राथमिक शिक्षण दुशेरे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. गावातील साध्या शिक्षणातून तिने अभ्यासाची नाळ घट्ट धरली. पुढे माध्यमिक शिक्षण कराड येथील विठामाता हायस्कूलमध्ये पूर्ण केले. उच्च माध्यमिकअकरावी, बारावीचे शिक्षण लिगाडे पाटील कॉलेज, विद्यानगर येथे घेताना तिच्या डोळ्यात विमानांबद्दलची ओढ अधिकच बळावली.

कष्टावर मात करत गाठली उंची
या आवडीनेच प्रतीक्षाला पुढे चेन्नई येथे वैमानिक अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली. तिथे तिने आधुनिक तंत्रज्ञान, विमानाचे बांधकाम, सुरक्षा पद्धती आणि उड्डाणाशी संबंधित प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केले. शिक्षणाची ही उंच झेप घेतल्यानंतर प्रतीक्षाने आणखी एक मोठे पाऊल उचलत लंडनमधील जगप्रसिद्ध क्यानफिल्ड विद्यापीठात एमएस्सी पदव्युत्तर उच्च शिक्षण पूर्ण केले. जागतिक स्तरावर वैमानिक अभियांत्रिकी क्षेत्रात नावाजलेल्या विद्यापीठातून पदवी पूर्ण करून ती नुकतीच गावी परतली आहे. तिच्या या प्रवासामध्ये घरच्या कुटुंबाचा मोलाचा पाठिंबा होता.

ग्रामीण मुलींसाठी प्रेरणाः उंच भरारीची कहाणी
दुशेरेसारख्या छोट्याशा गावातून लंडनपर्यंतचा प्रवास हा केवळ शिक्षणाचा नाही तर ग्रामीण भागातील मुली काय साध्य करू शकतात याचे ठोस उदाहरण आहे. प्रतीक्षाच्या या यशाने गावातीलच नव्हे तर कराड तालुक्यातील अनेक मुलींच्या मनातही मोठी स्वप्ने पाहण्याची ऊर्जा निर्माण झाली आहे. गावात मर्यादित सुविधा, साधे शिक्षण आणि आर्थिक अडचणी असूनही प्रतीक्षाने दाखवून दिले की जिद्द असेल तर गाव कितीही छोटे असो, स्वप्नांची उंची ठरवण्याची ताकद स्वतःमध्येच असते.

वडील संजय पाटील शेती करत असून आई कृष्णा हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे. ग्रामीण भागातील या दोन्ही पालकांनी मुलीला घरातील सदस्यांनी तसेच आजोळच्या लोकांनी शिक्षणाची विद्यापीठातूनपदवी पूर्ण करून ती नुकतीच गावी परतली आहे. तिच्या या प्रवासामध्ये घरच्या कुटुंबाचा मोलाचा पाठिंबा होता. वडील संजय पाटील शेती करत असून आई कृष्णा हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे. ग्रामीण भागातील या दोन्ही पालकांनी मुलीला घरातील सदस्यांनी तसेच आजोळच्या लोकांनी शिक्षणाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अखंड पाठिंबा दिला.

या उच्च शिक्षणाचा उपयोग काय?
प्रतीक्षाच्या वैमानिक अभियांत्रिकीच्या शिक्षणाचे व्यावहारिक उपयोग अनेक आहेत. विमानांचे तांत्रिक देखभाल, बांधकाम, सुरक्षा यंत्रणा आणि उड्डाण प्रणालींचे तंत्रज्ञान हाताळण्याचे कौशल्य, एअरलाईन्स, संरक्षण क्षेत्र, विमानतळ उद्योग, संशोधन संस्था, एरॉनॉटिकल कंपन्यांमध्ये करिअरची संधी तसेच भारत, परदेशात तांत्रिक पदांवर काम करण्याची व्यापक दारे नवीन विमान तंत्रज्ञान, ड्रोन प्रणाली, एअरोस्पेस संशोधन या क्षेत्रात योगदान देण्याची संधी मिळते.

Comments are closed.