सोनाक्षी–जहीरच्या नात्यात लग्नाआधी तणाव; भांडण इतके वाढले की केस उपटण्याची आली होती वेळ – Tezzbuzz

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)आणि जहीर इक्बाल यांच्या प्रेमकथेनं नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण त्यांच्या लग्नाआधी दोघांच्या नात्यात मोठा संघर्ष आला होता, हे फार कमी लोकांना माहीत आहे. अलीकडेच सोनाक्षीने स्वतः या नात्यातील चढ-उतारांविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.

एका पॉडकास्टमध्ये बोलताना सोनाक्षीने सांगितले की ती आणि जहीर तब्बल तीन वर्षे एकत्र राहत होते. या काळात त्यांच्यात वारंवार भांडणं होत असत, आम्ही इतका राग राग करायचो की, कधी कधी एकमेकांचे केस उपटण्याची वेळ यायची. समोरचा नेमकं काय म्हणतोय-काहीच समजत नव्हतं, असे सोनाक्षीने सांगितले. सततच्या गैरसमजांमुळे दोघांच्याही नात्यात ताण निर्माण झाला होता.

या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जहीर इक्बालनेच कपल्स थेरपीचा सल्ला दिला. सुरुवातीला सोनाक्षीला ती शंका वाटली, पण तिने ते मान्य केले. फक्त दोन थेरपी सेशननंतर दोघांच्या संवादातील अडथळे कमी झाले आणि नाते पुन्हा पूर्ववत होऊ लागले. थेरपीने आम्हाला शिकवले की आपण जे बोलतो त्याचा अर्थ समोरचा चुकीचा लावतो. थेरपीमुळे आमचं नातं पुन्हा रुळावर आलं, असे सोनाक्षीने स्पष्ट सांगितले.

प्रेम कधी फुलले, याबद्दल बोलताना सोनाक्षी म्हणाली की तीच सर्वात आधी जहीरला ‘I Love You’ म्हणणार होती, पण तिने हिंट दिल्यावर जहीर मोठ्याने हसत म्हणाला, ही तर पागल वाटतेय.सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट सलमान खान यांच्या पार्टीत झाली. तेथे दोघांनी मैत्री केली आणि ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. सात वर्षे दोघांनी आपले नाते पूर्णपणे खाजगी ठेवल्यानंतर शेवटी जून 2024 मध्ये त्यांनी मुंबईत मॅरेज केले आणि नंतर बास्टियन येथे भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले.थेरपीमुळे आपले नाते वाचवता आले, हे कबूल करत दोघांचेही प्रामाणिक स्वीकृतीने चाहत्यांच्या मनात या कपलची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

पुष्पा’ला पाच वर्षे पूर्ण; अल्लू अर्जुनची सुकुमारसोबतची खास आठवण सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.