सोशल मीडियावर ‘धुरंधर’चा बोलबाला, आता आगामी सिक्वेलकडे प्रेक्षकांचे लक्ष

बॉलिवूड स्टार रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरंधर’ या शुक्रवार (५ डिसेंबर) प्रदर्शित झाला. चित्रपटातील प्रत्येकाच्या अभिनयावर प्रेक्षक फीदा असून, या चित्रपटाचा बोलबाला सोशल मीडियावर चांगलाच रंगला आहे. यात दुग्धशर्करा योग म्हणजे या चित्रपटाचा सिक्वेल हा 2026 च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

‘धुरंधर’चा सिक्वेल १९ मार्च २०२६ ला ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. दुसऱ्या भागात पुढची कथा अधिक रंजक होत जाणार असून, निर्मात्यांनी दोन मिनिटांच्या पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये याची एक रोमांचक झलक दाखवली आहे. ‘धुरंधर’च्या रिलीजपूर्वी, अभिनेता राकेश बेदीने चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल आपले मौन सोडले होते. दुसऱ्या भागाबद्दल, अभिनेत्याने उत्तर दिले, “हो, ते खरे आहे. मीही तेच ऐकले आहे. कारण मी या चित्रपटाच्या अर्ध्या भागातच आहे.

धुरंधरची कथा, अभिनय, संगीत अशी भट्टी उत्तम जुळून आल्याने, चाहत्यांच्या मनात या चित्रपटाने स्थान मिळवले आहे. संजय दत्तसाठी हा चित्रपट मैलाचा दगड ठरणार आहे. तर अक्षय खन्ना याच्या अभिनयाने रणवीरही झाकोळला जातोय की काय अशी एकूण परिस्थिती या चित्रपटात पाहायला मिळते.

निर्मात्यांनी धुरंधरचा भाग २ ईदच्या निमित्ताने प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याने, बॉक्स ऑफिसचे वातावरण मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. ईदवर अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात साऊथ सुपरस्टार यशचा टॉक्सिक, संजय लीला भन्साळीचा लव्ह अँड वॉर आणि अजय देवगणचा धमाल ४ यांचा समावेश आहे. या ईदमध्ये कोणता चित्रपट बाजी मारतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Comments are closed.