दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडेत विजय मिळवून देखील तिसऱ्या वनडेत दोघांना बाहेर ठेवणार? कारणं समोर
विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांपैकी पहिले दोन सामने पार पडले आहेत. भारतानं रांची येथे झालेला पहिला एकदिवसीय सामना 17 धावांनी जिंकला होता. तर, रायपूर येथे झालेला दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेनं 4 विकेटनं जिंकला होता. यामुळं मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत पोहोचले आहेत. आता निर्णायक तिसरा सामना विशाखापट्टणममध्ये होणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी 300 हून अधिक धावा केल्या होत्या. विशेष बाब म्हणजे कॅप्टन केएल राहुल याला दोन्ही सामन्यात नाणेफेक जिंकण्यात अपयश आलं होतं. दक्षिण आफ्रिका दुसरा सामना जिंकून देखील तिसऱ्या सामन्यात संघात दोन बदल करु शकते.
भारतानं पहिल्या वनडेचा संघ दुसऱ्या सामन्यात देखील कायम ठेवला होता. भारताकडे गोलंदाजीमध्ये फार बदल करण्याची संधी नाही. फलंदाजी मध्ये तिलक वर्माला संधी द्यायची झाल्यास कोणाच्या जागेवर द्यायची असा प्रश्न देखील टीम मॅनेजमेंट समोर आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर दोन्ही मॅचेसमध्ये दक्षिण आफ्रिकेनं खूप धावा काढल्या होत्या. मात्र, भारतीय संघासमोर त्याला बाहेर काढण्याचा पर्याय नाही.
दुसरीडे दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांच्या दोन खेळांडूना मांसपेशी दुखावल्यानं संघाबाहेर ठेवू शकतो. ज्यांना दुसऱ्या वनडेत त्रास झाला होता. दक्षिण आफ्रिका नांद्रे बर्गर आणि टोनी डीजॉर्जी यांना संघाबाहेर ठेवू शकते. त्यांच्या जागी ऑटनील बार्टमेन आणि रेयान रिकल्टन यांना संधी दिली जाऊ शकते.
विशखापट्टणममधील भारताची कामगिरी संमिश्र राहिली आहे. डिसेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारतानं 387 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतानं केवळ 117 धावा केल्या होत्या.
भारताचा संभाव्य संघ : यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा
दक्षिण आफ्रिका संभाव्य संघ: एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा, मॅथ्यू ब्रेटशके, रायन रिक्लेटन, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.
भारत मालिका जिंकणार?
दक्षिण आफ्रिकेनं भारताला वनडे मालिकेपूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत 2-0 असं पराभूत केलं होतं. भारतीय संघ वनडे मालिकेत परतफेड करेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. भारतीय चाहत्यांचा अपेक्षा आता तिसऱ्या वनडेतील विजयानं पूर्ण होतात का ते पाहावं लागेल. दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समान संधी आहे.
आणखी वाचा
Comments are closed.