WBBL – आश्चर्यकारक! खेळपट्टीने गिळला चेंडू अन् सामना झाला रद्द; क्रिकेटच्या इतिहासातील विचित्र घटना…

Women’s Big Bash League चा थरार सुरू आहे. शुक्रवारी (5 डिसेंबर 2025) या स्पर्धेत एक अशी घटना घडली की ज्यामुळे सामना रद्द करावा लागला. एडिलेड स्ट्राइकर्सविरुद्ध होबार्ट हरिकेन्स यांच्यामध्ये सामना सुरू होता. एडिलेड स्ट्राइकर्सने प्रथम फलंदाजी करताना चार गड्यांच्या मोबदल्यात 167 धावा केल्या. मात्र, याच दरम्यान खेळपट्टीवर रोलर फिरवत असताना रोलरच्या खाली चेंडू आल्याने सामना रद्द करावा लागला.
होबार्ट हरिकेन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि स्ट्राइकर्सना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. मेडेलाईन पेन्नाने नाबाद 63 धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे स्ट्राइकर्सने 20 षटकांमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात 167 धावांची खेळी केली. होबार्ट हरिकेन्सना जिंकण्यासाठी 168 धावांचे आव्हान मिळाले होते. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी संघ तयारी करत होता. मात्र, डाव थांबला तेव्हा WBBL च्या नियमांमुसार खेळपट्टीवर रोलर फिरवण्यात येत होता. याच दरम्यान स्ट्राइकर्स संघाचे खेळाडू मैदानामध्ये सराव करत होते. सराव करत असताना चेंडू चुकून खेळपट्टीवर गेला आणि नेमका रोलरच्या खाली दबला गेला. त्यामुळे खेळपट्टीवर चेंडूंच्या आकाराचा मोठा खड्डा पडला. पंचांनी खेळपट्टीची पाहणी केली असता खेळपट्टी खेळण्यायोग्य नव्हती. त्यानंतर दोन्ही कर्णधारांना याची कल्पना देण्यात आली आणि सामना रद्द करण्यात आला.
कॅरेन रोल्टन ओव्हल येथे एक महत्त्वाचा WBBL खेळ डावाच्या विश्रांतीदरम्यान सोडून देण्यास भाग पाडले गेले कारण चुकीचा चेंडू रोलरच्या खाली गेला आणि खेळपट्टीला छिद्र पडले. कथा: https://t.co/6H7GaupRqs pic.twitter.com/0CzTA7DkQN
— 7न्यूज ॲडलेड (@7न्यूज ॲडेलेड) 6 डिसेंबर 2025

Comments are closed.