सूर्यकुमार-अभिषेक नाही, ‘हा’ खेळाडू जिंकून देणार भारतीय संघाला वर्ल्डकप! माजी क्रिकेटपटूने केली भविष्यवाणी

फेब्रुवारी 2026 मध्ये टी20 विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. मागील विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता आणि ते पुन्हा ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार दिसत आहेत. सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांच्यावर सर्वांचे लक्ष आहे, कारण फलंदाजीच्या क्रमवारीत ते दोघेही भारतीय संघाचे सर्वात महत्त्वाचे खेळाडू आहेत. तथापि, माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी एका अशा खेळाडूचे नाव सांगितले, ज्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकू शकतो.

इरफान पठाण यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाबद्दल चर्चा केली. याचदरम्यान त्यांनी सांगितले की हार्दिक पांड्याची उत्कृष्ट कामगिरी भारतीय संघाला 2026 चा टी20 विश्वचषक विजेता बनवू शकतो. ते म्हणाले, “टी20 सामने आणि विश्वचषकात भारतीय संघासाठी हार्दिक पांड्या सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. हार्दिक आणि त्याच्यासोबत खेळणारा दुसरा फिनिशर हे ठरवतील की भारतीय संघ पुन्हा ट्रॉफी उचलेल की नाही.”

हार्दिक पांड्याबद्दल बोलत असताना, इरफान पठाण यांनी टी20 विश्वचषकासाठीच्या टीम इंडियाच्या संघात होणाऱ्या बदलांबद्दलही सांगितले. याच दरम्यान, रिंकू सिंगला भारतीय संघातून वगळल्याबद्दल पठाण यांनी निराशा व्यक्त केली. त्यांच्या मते, संघात फार बदल होणार नाहीत. ते म्हणाले, “हार्दिक पांड्या परत आला आहे, याच कारणामुळे रिंकू सिंग बाहेर पडला आहे. ही खूप निराशाजनक गोष्ट आहे, पण याची अपेक्षा होतीच. सध्याच्या ग्रुपमधील 90-95% खेळाडू टी20 विश्वचषक 2026 साठीच्या भारतीय संघाच्या स्क्वाडचा भाग असतील.”

Comments are closed.