जान ही ले ले; दीपिकाच्या पोस्टवर रणवीर सिंहचे मजेदार कमेंट, युजरचा टोला – जान तर तुम्हीच धुरंधरमध्ये घेतली आहे – Tezzbuzz

बॉलिवूडचा लव्हली कपल दीपिका पदुकोण (Deepika Padukone)आणि रणवीर सिंह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण आहे रणवीरची नुकतीच रिलीज झालेली फिल्म ‘धुरंधर’ आणि दीपिकाने त्यासाठी केलेली खास मूवी डेट नाईट. ५ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल झालेल्या या एक्शन ड्रामाला प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच, दीपिकाने शेअर केलेल्या काही फोटोंनी सोशल मीडियावर नवा जलवा निर्माण केला आहे.

दीपिका पादुकोणने इंस्टाग्रामवर रणवीरसोबतच्या मूव्ही डेट नाईटचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले. कॅप्शनमध्ये तिने लिहिले, Film Date Night – #Dhurandhar आणि रणवीरला टॅग केले. दीपिकाचा लुक आणि तिचा सपोर्ट पाहून रणवीर थक्क झाला. त्याने पोस्टवर सुपर रोमँटिक कमेंट करत लिहिलं, “जान ही लेले” आणि सोबत चाकूचा मजेशीर इमोजीही टाकला. रणवीरची ही कमेंट पहाताच चाहत्यांना भन्नाट रिऍक्शन्सची बरसात केली.

एका युजरने लिहिले, “भाई, जान तो तुमने ले ली है ‘धुरंधर’ मधील परफॉर्मन्सने, तर दुसऱ्याने कमेंट केली, भाई, तुम सबकी जान ले चुके हो!” अनेकांनी रणवीरच्या अभिनयाचे कौतुक करत अभिनंदन केले, तर एका चाहत्याने लिहिले, “तुम्ही खूप लकी आहात, तुम्हाला दीपिका मिळाली.”

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’मध्ये संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांसारखे दमदार कलाकार आहेत. आदित्य धर दिग्दर्शित ही फिल्म एका सत्यकथेवर आधारित असून भरपूर एक्शन, हाई-इंटेन्सिटी सीन्स आणि ड्रामा यामुळे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी २७ कोटींची दमदार ओपनिंग घेतली.

फिल्म पाहिल्यानंतर दीपिका पादुकोणनेही रणवीरचे उत्स्फूर्त कौतुक केले. तिने लिहिले, “तुझा अभिमान आहे” आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. रणवीरच्या परफॉर्मन्सने दीपिका भारावली असून या कपलचे हे रोमँटिक मोमेंट्स आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

री-रिलिझ 2025; फ्लॉप ठरलेला चित्रपट झाला ब्लॉकबस्टर, नव्या फिल्मचीही बदलली किस्मत

Comments are closed.