Ind vs SA: 2 वर्षांनंतर भारतीय संघाचे चमकले नशीब, सलग 20 पराभवांनंतर भारताने जिंकला टॉस!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक मोठी गुड न्यूज मिळाली आहे. सलग 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये टॉस हरल्यानंतर अखेर भारतीय संघाने टॉस जिंकला आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने शेवटचा टॉस दोन वर्षांपूर्वी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये जिंकला होता. तेव्हापासून 21 व्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला आहे.
सलग 20 वेळा टॉस हारल्यानंतर अखेर भारताने वनडे सामन्यांमध्ये टॉस जिंकला आहे. यापूर्वी कोणत्याही संघाची इतकी वाईट अवस्था झाली नव्हती. भारतीय संघाचा टॉस हरण्याचा हा सिलसिला 2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलपासून सुरू झाला होता आणि दोन वर्षांहून अधिक काळ उलटूनही तो संपण्याचे नाव घेत नव्हता. रोहित शर्मा नंतर शुभमन गिल कर्णधार झाला, पण हे दुर्दैव संपले नाही.
मग शुबमन गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत संघाची कमान सांभाळली, पण तो देखील सुरुवातीचे दोन सामने टॉस हरला. यामुळे वनडेमध्ये सलग 20 वेळा टॉस हारण्याचा शर्मनाक विक्रम भारताच्या नावावर नोंदवला गेला.
तरीही, आता तिसऱ्या वनडेमध्ये कर्णधार राहुलने टॉस जिंकून हा विक्रम तोडला आहे. टॉस जिंकल्यानंतर राहुल खूप आनंदी दिसत होता.
Comments are closed.