आधी कारवरच नियंत्रण सुटलं, नंतर कार डिव्हायडला धडकली अन् पेटली, विवाह समारंभावरून घरी निघालेल्य


कर्नाटक: कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातून एका अत्यंत धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. या भागात एका पोलीस निरीक्षकाचा कारमध्ये जिवंत जळून दुर्दैवी (Accident News) मृत्यू झाला आहे. भरधाव वेगातील त्यांची कार रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र काहीही उपयोग झाला नाही. (Accident News)

Accident News: गदग येथून विवाह समारंभाला उपस्थित राहून धारवाडला परत येत होते

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यावर कारला भीषण आग लागली. या घटनेमध्ये कारमधील पोलीस निरीक्षकाचा होरपळून मृत्यू झाला, ही दुर्दैवी घटना काल (शुक्रवारी,ता ५) रात्री धारवाड जवळ घडली. पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ हे कारमधून एकटेच गदग येथून विवाह समारंभाला उपस्थित राहून धारवाडला परत येत होते. कारमधून परत येत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला आदळली. कार डिव्हायडरला धडकल्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला. त्यामुळे सालीमठ यांना कारमधून बाहेर पडता आले नाही. कारने चारही बाजूने पेट घेतल्यामुळे सालीमठ यांचा होरपळून मृत्यू झाला. आग इतकी भीषण होती की सालीमठ यांच्या मृतदेहाची देखील राख झाली होती. घटनास्थळी असणाऱ्या लोकांनी पोलीस आणि अग्निशामक दलाला कळवले पण तोपर्यंत सालीमठ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Accident News: आगीच्या भडक्यामुळे कोणीही गाडीजवळ जाऊ शकले नाही

दरम्यान, प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी व्यक्त केलेल्या या अपघाताबाबतच्या अंदाजानुसार, धडक बसल्यानंतर कारचे दरवाजे लॉक झाले असावेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ यांना गाडीतून बाहेर पडता आले नाही. त्यांनी बचावासाठी आरडाओरड केली, मात्र आगीच्या भडक्यामुळे कोणीही गाडीजवळ जाऊ शकले नाही. नागरिकांनी तातडीने घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. दुर्दैवाने, इन्स्पेक्टर पंचाक्षरी सलीमथ यांचा कारमध्येच जळून मृत्यू झाला होता.

पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अपघाताचे नेमके कारण काय होते, कार अनियंत्रित का झाली, याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. अपघाताच्या ठिकाणाजवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.