कारचा स्पीड 140, नियंत्रण सुटलं अन् ट्रकच्या मागच्या बाजूस घुसली, वाहनाचा चेंदामेंदा; दोन जिवलग
अपघाताच्या बातम्या: अहमदपूर–नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील (Ahmedpur-Nanded National Highway) अहमदपूर बायपासजवळ आज (दि. 06) पहाटे 2 ते 2.30 च्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या हुंडाई क्रेटा (क्र. MH 24 AT 9777) कारने नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकला (क्र. K 32 D 0966) पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, क्रेटा कार अक्षरशः ट्रकच्या मागील भागात घुसली.
Accident News: कारचा अक्षरशः चेंदामेंदा, तरुणांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, क्रेटामधील चालक रविकुमार तुकाराम दराडे (20, रा. कराड नगर, अहमदपूर) व त्याचा मित्र सागर दिलीप ससाने (20, रा. फतेपूर, अहमदपूर) हे दोघे शिरूर ताजबंद येथून जेवण करून अहमदपूरकडे परत येत होते. त्याच वेळी ट्रकला पाठीमागून झालेल्या जबर धडकेत कारचे अक्षरशः तुकडे झाले आणि ती पूर्णपणे ट्रकखाली दाबली गेली. अपघातात ट्रकचेही मोठे नुकसान झाले असून ट्रकचे मागील चार टायर तुटून रस्त्यावर पडले.
Accident News: कारचा वेग 120 ते 140 किमी प्रतितास
घटनास्थळी उपस्थित पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार अपघाताच्या वेळी क्रेटा कारचा वेग तब्बल 120 ते 140 किमी प्रतितास होता. कार ट्रकखाली अडकून राहिल्याने क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली आणि त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन्ही तरुणांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आणि त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
Accident News: स्थानिक प्रशासनाची तातडीने मदत
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले आणि पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मदतकार्य सुरू करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
Accident News: ट्रकचालकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
या प्रकरणी ट्रकचालक मुनीर चुन्नुमीया पाशा यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 795/2025 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106(1), 281, 324(4)(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Jalgaon Bus Fire: धावत्या प्रवासी वाहनाला अचानक आग
दरम्यान, अमळनेर–पारोळा रस्त्यावर धावत्या प्रवासी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. वाहनात धूर निघताना दिसताच चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. प्रवासी तत्काळ खाली उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
आणखी वाचा
Comments are closed.