Rum Massage: हिवाळ्यात रमने मसाज करतात? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे
थंडीत अनेक जण म्हणतात की रम घेतल्याने उबदार वाटते आणि सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की रम ही मसाज करण्यासाठी वापरली जाते. हे ऐकून बहुतांश जणांना हा प्रश्न पडला असेल की रमने मसाज करणं शरीरासाठी चांगलं असतं का? तर त्याचं उत्तर जाणून घेऊया.. ( What Happens When You Massage With Rum? )
रमणे मसाज का?
रम मसाज हा पारंपारिक उपायांपैकी एक मानला जातो. उबदारपणासाठी थोडी रम हातावर घेऊन पाठ, छाती, हात, पायांवर हळूवारपणे मालिश केली जाते. सुरुवातीला यामुळं थंड वाटते, पण काही वेळाने रक्ताभिसरण वाढल्यामुळे उबदारपणा जाणवतो. मात्र त्वचेवर जखमा असतील तर रम लावणं योग्य ठरत नाही.
रमने मालिश केल्याने काय होते?
रमने मालिश केल्याने शरीरात रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे शरीर उबदार होतं. तसेच रम मसाजमुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेतून सांधेदुखीपासून आराम मिळतो. बरेच जण सर्दी, थकवा किंवा स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी याचा वापर करतात. तसेच अनेकदा रमच्या सुगंधामुळं मूडही चांगला राहतो.
Comments are closed.