सूर्यकुमार यादव टी20 क्रिकेटमध्ये नंबर-1, मोडीत काढला मोठा रेकॉर्ड

भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून जबरदस्त कामगिरी करत आहे. केरळविरुद्धच्या सामन्यात सूर्याने 25 चेंडूंमध्ये 32 धावा ठोकल्या, ज्यात त्याने चार चौकार मारले. मात्र, त्याची ही खेळी मुंबईला विजय मिळवून देऊ शकली नाही आणि संघाने तो सामना 15 धावांनी गमावला. केरळने प्रथम फलंदाजी करताना 178 धावा केल्या होत्या, त्याला उत्तर देताना मुंबईचा संघ 163 धावांवर बाद झाला. पण या खेळीच्या जोरावर सूर्याने टी20 क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात 32 धावा करताच, सूर्या टी20 क्रिकेटमध्ये मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने आदित्य तरेचा विक्रम मोडला आहे, ज्याच्या नावावर 1713 धावा होत्या. आता 1717 धावांसह सूर्यकुमार मुंबईचा नंबर-1 रन-स्कोरर बनला आहे. सूर्यकुमार 2010 पासून मुंबईसाठी टी20 क्रिकेट खेळत आहे आणि आतापर्यंत खेळलेल्या 71 सामन्यांमध्ये त्याने 1717 धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याच्या बॅटमधून 9 अर्धशतके निघाली आहेत.

Comments are closed.